Jalna–Jalgaon Railway News नमस्कार मित्रांनो, आज आपण जालना ते जळगाव रेल्वे प्रकल्पाबद्दलची माहिती पाहणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्पात 174 किलोमीटर लांबीच्या जालना–जळगाव रेल्वे प्रकल्पासाठी तब्बल ₹5804 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांना थेट जोडणी देणे हा असून या मार्गावर एकूण 17 स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला कमी अंतरात थेट जोडणाऱ्या या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामांना आता गती मिळू लागली आहे. या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ₹5804 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भूसंपादनासाठीची मोजणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. पुढील वर्षभरात 174 किलोमीटरच्या या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पासाठी सुमारे ₹7000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या 174 किलोमीटर रेल्वे मार्गापैकी जवळपास 140 किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातून जाणार आहे, तर उर्वरित 34 किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. सध्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यान रेल्वेने प्रवास करताना मोठा वळसा घ्यावा लागतो. नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. यासोबतच या रेल्वे मार्गामुळे मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे.
या तालुक्यांचा असणार समावेश Jalna–Jalgaon Railway News
हा रेल्वे मार्ग जालना, भोकरदन आणि बदनापूर तालुक्यांतून जाणार आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील 9 गावांमधील सुमारे 146 हेक्टर जमीन, तर भोकरदन तालुक्यातील 16 गावांमधील सुमारे 180 ते 270 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Free Zerox Machine Yojana – मोफत झेरॉक्स मशीन महिलांना मिळणार 100% अनुदान..!
दरम्यान, जळगाव तालुक्यातील तरसोद, पिंपळे, कुसुंबा, आसोदा, देवाही, धानवड, मन्यारखेडा तसेच जळगाव बुद्रुक परिसरातील एकूण सुमारे 86.69 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
तसेच जालना, बदनापूर, भोकरदन आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून हा मार्ग जाणार आहे. जालना उपविभागातील नागेवाडी, तुपेवाडी, देऊळगाव मान, देऊळगाव नजीक, पांगरी, मांडवा, खादगाव, दावलवाडी, तसेच भोकरदन तालुक्यातील गारखेडा, बिलोरा, क्षीरसागर, नांजा, सोयगाव, देवी, तपोवन, वालसा, खालचा चांदई, ठोंबरी, देऊळगाव ताड, बोरगाव, तारू, मोठा राजूर, चांदई टिपली, चिंचोली, जोमाळ या गावांमधून हा मार्ग जाणार आहे.
हा रेल्वे मार्ग जालना – राजूर – सिल्लोड – अजिंठा – जळगाव असा प्रस्तावित आहे. त्यामुळे अजिंठा लेणी, तीर्थक्षेत्र राजूर येथील गणपती मंदिर तसेच मराठवाडा भागाला मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गांशी थेट जोडणी मिळणार आहे.
