Free Zerox Machine Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण मोफत झेरॉक्स मशीन योजनेबद्दलची माहिती येथे पाहणार आहोत. आजच्या धावपळीच्या युगात महिला केवळ घरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या विविध क्षेत्रांमध्ये आपली छाप उमटवत आहेत. मात्र आजही ग्रामीण व शहरी भागातील अनेक सुशिक्षित महिला रोजगाराच्या शोधात आहेत.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने विविध योजना राबवत आहे.
Free Zerox Machine Yojana मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना म्हणजे मोफत झेरॉक्स मशीन वाटप योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन, प्रिंटर आणि संगणक संच दिला जातो. या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया.
ही योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभाग तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्या माध्यमातून राबवली जात आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवणे. अनेक महिलांकडे कौशल्य असते, परंतु भांडवलाच्या अभावी त्या व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सरकार महिलांना व्यवसायासाठी लागणारे साहित्य पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना झेरॉक्स मशीन खरेदीसाठी स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, कारण शासन मशीन खरेदीवर 100% अनुदान देणार आहे.
Free Zerox Machine Yojana उद्दिष्ट
- महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे
- ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच झेरॉक्स सुविधा उपलब्ध करून देणे
- विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना शहरात जाण्याची गरज कमी करणे
- सुशिक्षित बेरोजगार महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे
- या मशीनच्या माध्यमातून महिला स्वतःचे सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र सुरू करून अधिक सक्षमपणे व्यवसाय करू शकतात.
Free Zerox Machine Yojana मध्ये मिळणारी साधने
- उच्च दर्जाचे फोटोकॉपी (झेरॉक्स) मशीन
- संपूर्ण कॉम्प्युटर सेट (मॉनिटर, CPU, कीबोर्ड, माऊस)
- प्रिंटर आणि स्कॅनर
- काही ठिकाणी प्राथमिक तांत्रिक प्रशिक्षण देखील दिले जाते.
Free Zerox Machine Yojana पात्रता व निकष
- अर्जदार महिला महाराष्ट्र रहिवासी असावी
- वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे
- किमान दहावी उत्तीर्ण असावी (उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य)
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 पेक्षा जास्त नसावे
- कुटुंब दारिद्र्यरेषेखालील (BPL) असावे
- विशेष प्राधान्य खालील महिलांना दिले जाईल:
- विधवा महिला
- घटस्फोटित महिला
- दिव्यांग महिला
- मागासवर्गीय प्रवर्गातील महिला
- तसेच अर्जदार महिलेला यापूर्वी जिल्हा परिषदेकडील शिलाई मशीन, पीठ गिरणी इत्यादी वैयक्तिक लाभाच्या योजना मिळालेल्या नसाव्यात.
Free Zerox Machine Yojana आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (दहावी/बारावी गुणपत्रक)
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- प्रतिज्ञापत्र
Free Zerox Machine Yojana अर्ज प्रक्रिया
- जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
आँनलाईन अर्ज
- जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतो.
- आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा पोर्टलवरून अर्ज फॉर्म भरावा.
ऑफलाईन अर्ज
- आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात किंवा
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात जाऊन अर्ज मिळवू शकता.
अर्ज करताना:
- अर्ज फॉर्ममध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण इ. माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात.
- पूर्ण भरलेला अर्ज समाजकल्याण विभागात जमा करा.
- अर्जाची पोस्ट पावती/रसीद जपून ठेवा.
