Drone anudan yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो, आज आपण ड्रोन सबसिडीबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. सध्या आधुनिक शेतीचा अवलंब करताना नवीन तंत्रज्ञान आणि यंत्रांचा वापर करून शेतीची अनेक कामे सोपी झाली आहेत. यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी सक्षम होत आहेत.
या प्रक्रियेत ड्रोनचा वापर फवारणीसाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पूर्वी शेतकरी पाठीवरचे पंप, एचडीपी पंप किंवा छोट्या ट्रॅक्टरचा वापर फवारणीसाठी करत होते. मात्र ही पद्धत आता जुनी होत चालली असून त्यामध्ये काही मर्यादा देखील आहेत.
Drone anudan yojana Maharashtra फवारणी करताना वापरण्यात येणारी औषधे शरीरासाठी घातक असतात. परंतु ड्रोनच्या मदतीने फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा या औषधांशी संपर्क कमी होतो. तसेच काही पिकांसाठी ड्रोनचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. ड्रोनच्या सहाय्याने फवारणी जलद आणि सुरक्षित पद्धतीने करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात.
आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रांचा शेतीत वापर केल्यामुळे शेतकरी कमी वेळेत जास्त काम करू शकतात. ड्रोनच्या मदतीने पिकांची फवारणी जलद आणि अधिक अचूक पद्धतीने होते. यामुळे फवारणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च देखील कमी होतो.
सध्या शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत 40 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.
- महिला बचत गटांना – 80% अनुदान
- फार्म प्रोड्युसर कंपनी (FPO) – 75% अनुदान
- कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांना – 50% अनुदान
- सामान्य शेतकऱ्यांना – 40% अनुदान
तसेच ड्रोन खरेदीसाठी 90% पर्यंत कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे.
मुलींच्या लग्नासाठी ५० हजार रुपये अनुदान, इथे वाचा संपूर्ण माहिती..! vivah anudan yojana 2026
आवश्यक कागदपत्रे Drone anudan yojana Maharashtra
ड्रोन खरेदीसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- रहिवासी दाखला / डोमिसाइल प्रमाणपत्र
- शेतजमिनीचा 7/12 उतारा (सातबारा)
- 8A उतारा
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट साईज फोटो
- आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- ड्रोन खरेदीचे कोटेशन किंवा बिल
- शेतकरी गट / FPO असल्यास नोंदणी प्रमाणपत्र
आजच्या आधुनिक युगात शेतकऱ्यांनी आपली शेती पद्धती बदलणे अत्यंत आवश्यक झाले आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. खर्चात बचत करून उत्पादन वाढवण्यासाठी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी ड्रोनला केवळ शेतीसाठी नव्हे तर एक व्यवसायिक संधी म्हणूनही पाहावे.
अशाच प्रकारे नवनवीन माहिती हवी असल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा
