pm surya ghar yojana 2026 नमस्कार मित्रांनो, आज आपण पीएम सूर्य घर योजना बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलापासून कायमची सुटका मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे.
महावितरणच्या वाढत्या वीज बिलांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. अगदी छोट्या कुटुंबालादेखील हजारो रुपयांचे वीज बिल भरावे लागते. त्यामुळे या त्रासापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पीएम सूर्य घर योजना ही एक मोठी संधी ठरत आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
योजनेचे फायदे PM Surya Ghar Yojana 2026
मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्ही स्वतः वीज निर्मिती करू शकता. तसेच ही वीज वापरण्यासोबतच अतिरिक्त वीज विकूही शकता.
या योजनेअंतर्गत ३ किलोवॅट सोलर सिस्टमसाठी सुमारे ₹78,000 पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. एकदा सोलर सिस्टम बसविल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात वीज बिल भरावे लागणार नाही.
सौर ऊर्जा प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी आणि भविष्यातील ऊर्जा संकटाला सामोरे जाण्यासाठी तयारी व्हावी, या उद्देशाने “हर घर सौर ऊर्जा” हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी सरकारची मोठी घोषणा…! Sanjay Gandhi niradhar yojana
पात्रता व निकष PM Surya Ghar Yojana 2026
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे:
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराच्या नावावर स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.
- घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी पुरेशी जागा असावी.
आवश्यक कागदपत्रे PM Surya Ghar Yojana 2026
- आधार कार्ड
- वीज बिल
- बँक खात्याचे पासबुक
- पॅन कार्ड
- मालमत्तेच्या मालकीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
Nuksan bharpai 2026 | गारपीट भरपाई 2026 मंजूर : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे
अर्ज प्रक्रिया PM Surya Ghar Yojana 2026
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
ऑनलाईन अर्ज:
शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे. त्यानंतर अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
ऑफलाईन अर्ज:
तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जाऊनही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
