Mumbai pune expressway मुंबई–पुणे दरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग: लोणावळा–खोपोली नवीन रस्ता

Mumbai pune expressway नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई–पुणे एक्सप्रेस वेबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, मुंबई–पुणे दरम्यान प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या महामार्गाची, म्हणजेच नवीन द्रुतगती मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 12 महिन्यांत या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन काम सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात पानगुटी अॅटल सेतू ते चौक या कर्जत टप्प्यातील काम हाती घेतले जाणार आहे. या द्रुतगती मार्गाची संपूर्ण नव्याने आखणी केली जाणार आहे.

मार्ग कसा असेल? Mumbai pune expressway

मित्रांनो, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी मुंबई–बेंगळुरू एक्सप्रेसवेची घोषणा केली होती. मुंबई–पुणे दरम्यान वाढलेली वाहतूक आणि सध्याच्या द्रुतगती मार्गावर होणारी कोंडी लक्षात घेऊन या नवीन बेंगळुरू द्रुतगती मार्गाचा एक भाग असलेल्या मुंबई–पुणे रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पावले उचलण्यात आली आहेत.

त्यातूनच पानगुटे ते चौक या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे.कर्जत ते खेड शिवापूर या अंतरासाठी सविस्तर प्रकल्प आराखड्याला मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. तसेच या मार्गासाठी भूसंपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे.

सध्या हा रस्ता आठ पदरी (8 लेन) केला जाणार आहे. मात्र भविष्यात 16 लेनपर्यंत विस्तार करण्याची क्षमता ठेवण्यासाठी सुमारे 100 मीटर जागा संपादित केली जाणार आहे.

घाटात नवीन बोगदे आणि उड्डाणपूल Mumbai pune expressway

नवीन द्रुतगती मार्गासाठी लोणावळा ते खोपोली दरम्यान पूर्णपणे नवीन रस्ता तयार केला जाणार आहे. यामध्ये बोगदे आणि उड्डाणपूलांचा समावेश असेल. तसेच मिसिंग लिंक आणि जुन्या महामार्गाबरोबरच घाट परिसरात हा तिसरा नवीन रस्ता उपलब्ध होणार आहे.

नवीन द्रुतगती मार्ग लोणावळा येथून पवना खोऱ्यातून मुळशी मार्गे खेड शिवापूर येथील शिवरे गावाजवळील रिंग रोडला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्यांसाठी हा रस्ता अधिक सोयीचा ठरणार आहे.

या मार्गाचा डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्याचे काम सुरू असून अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

जुन्या महामार्गासाठी डीपीआर Mumbai pune expressway

पुणे–मुंबई जुन्या महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला असून मान्यतेसाठी तो केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.

या रस्त्यावर 2030 पर्यंत आयआरबी (IRB) कडून टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण एमएसआरडीसी करणार की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, याबाबत पुढील काळात निर्णय घेतला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment