Mahatransco Ratnagiri Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ITI (Electrician) ट्रेडमधून शिक्षण पूर्ण केले असेल आणि सरकारी क्षेत्रात कामाचा अनुभव घेण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) अंतर्गत न्यू कोयना, जि. रत्नागिरी येथे शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि १६ मार्च २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा.
Mahatransco Ratnagiri Recruitment 2026 Notification
| भरती विभाग | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Mahatransco) |
|---|---|
| पदाचे नाव | शिकाऊ उमेदवार (Apprentice – Electrician) |
| एकूण जागा | 06 |
| नोकरी ठिकाण | न्यू कोयना, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्जाची अंतिम तारीख | 16 मार्च 2026 |
भरती नेमकी कुठे होणार?
महापारेषणच्या ४०० केव्ही ग्रहण केंद्र विभाग, न्यू कोयना (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे Electrician ट्रेड साठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
या भरतीद्वारे एकूण 06 पदे भरली जाणार असून वीज पारेषण क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
जागांचा तपशील (आरक्षण)
- अनुसूचित जाती – 01 जागा
- भटक्या जमाती (ब) – 01 जागा
- ओबीसी – 02 जागा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – 01 जागा
- खुला प्रवर्ग – 01 जागा
एकूण जागा – 06
शैक्षणिक पात्रता Mahatransco Ratnagiri Recruitment 2026
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
- दहावी (SSC) उत्तीर्ण
- ITI – Electrician ट्रेड उत्तीर्ण
- ITI प्रमाणपत्र NCVT मान्यताप्राप्त असणे आवश्यक
वयोमर्यादा
- किमान वय – 18 वर्षे
- कमाल वय – 30 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची वयोमर्यादा सवलत
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:
- सर्वप्रथम Apprenticeship Portal वर नोंदणी करावी.
- अर्ज करताना आस्थापना नोंदणी क्रमांक – E05202701232 निवडावा.
- अर्ज करताना नाव दहावी गुणपत्रिका, आधार कार्ड आणि अर्जामध्ये एकसारखे असणे आवश्यक.
- सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करावा.
| अधिकृत जाहिरात | इथं अर्ज करा |
| अर्ज प्रक्रिया | इथं क्लिक करा |
Mahatransco Apprentice Stipend
या भरतीच्या जाहिरातीत विद्यावेतनाची निश्चित रक्कम दिलेली नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार दरमहा विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.
निवड प्रक्रिया Mahatransco Ratnagiri Recruitment 2026:
या भरतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
- दहावीचे गुण
- ITI चे गुण
या दोन्ही गुणांची सरासरी काढून मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे Mahatransco Ratnagiri Recruitment 2026
अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- ऑनलाईन अर्जाची प्रत
- शाळा सोडल्याचा दाखला
- बोर्ड प्रमाणपत्र
- ITI गुणपत्रक
- जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
⚠️ महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
