RRC WR Apprentice Bharti 2026: रेल्वेमध्ये ५,३४९ जागांची मोठी भरती; १०वी आणि ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

RRC WR Apprentice Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही १०वी पास आणि ITI पूर्ण केलेले असाल, तर भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

पश्चिम रेल्वे (Western Railway) अंतर्गत ५,३४९ शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती रेल्वेच्या विविध डिव्हिजन आणि वर्कशॉप मध्ये केली जाणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली आहे आणि २३ मार्च २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.

RRC WR Apprentice Bharti 2026 – भरतीचा आढावा

भरती विभागपश्चिम रेल्वे (Western Railway)
पदाचे नावशिकाऊ उमेदवार (Apprentice)
एकूण जागा५,३४९
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू तारीख२१ फेब्रुवारी २०२६
अंतिम तारीख२३ मार्च २०२६

रिक्त जागांचा तपशील

अ.क्रपदपदसंख्या
शिकाऊ उमेदवार (Apprentice)५,३४९

शैक्षणिक पात्रता RRC WR Apprentice Bharti 2026

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:

  • उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असावा.
  • १०वी मध्ये किमान ५०% गुण असणे आवश्यक.
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI (National Trade Certificate) प्रमाणपत्र असणे आवश्यक.

PM Svanidhi Loan Scheme: आधार कार्डवर मिळणार ₹50,000 पर्यंत कर्ज; असा घ्या योजनेचा लाभ

वयोमर्यादा

  • किमान वय: १५ वर्षे
  • कमाल वय: २४ वर्षे

वयातील सवलत

प्रवर्गसवलत
ओबीसी०३ वर्षे
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती०५ वर्षे
दिव्यांग / माजी सैनिक१० वर्षे

अर्ज शुल्क

  • खुला / ओबीसी / EWS उमेदवार: ₹100
  • SC / ST / दिव्यांग / महिला: अर्ज शुल्क नाही

निवड प्रक्रिया RRC WR Apprentice Bharti 2026

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

  1. मेरिट लिस्ट (गुणवत्ता यादी)
  2. कागदपत्र पडताळणी
  3. वैद्यकीय तपासणी

MMRDA Bharti 2026 : मुंबईत 235 सरकारी नोकऱ्यांची सुवर्णसंधी | अर्जाची शेवटची तारीख 20 मार्च 2026

RRC WR Apprentice Stipend (पगार)

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना खालीलप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल:

  • स्टायपेंड: अंदाजे ₹7,000 ते ₹8,050 प्रति महिना
  • इतर भत्ते: TA, DA किंवा HRA मिळणार नाही
  • राहण्याची सोय: उमेदवाराने स्वतः करावी लागेल

महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू२१ फेब्रुवारी २०२६
अर्जाची अंतिम तारीख२३ मार्च २०२६

RRC WR Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कसा करावा?

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. होमपेजवरील Online Application लिंकवर क्लिक करा.
  3. New Registration करून आपली माहिती भरा.
  4. नोंदणी झाल्यानंतर ID आणि Password वापरून लॉगिन करा.
  5. वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  6. फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  7. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  8. अर्ज Submit करून Print Out जतन करून ठेवा.

महत्वाची कागदपत्रे

  • १०वी गुणपत्रिका
  • ITI गुणपत्रिका
  • जन्म दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

⚠️ महत्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Leave a Comment